Rashmi Mane
काँग्रेस खासदार आणि विरोधीपक्ष नेते राहुल गांधी वायनाड दुर्घटनेतील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी पुढे आले आहेत.
त्यांनी त्यांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी दिला आहे. पण तुम्हाला माहीत आहे का राहुल गांधी यांचा पगार किती?
राहुल यांच्या 20 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदाच विरोधीपक्षनेते पद भूषवत आहेत. त्यामुळे त्यांना सरकारकडून सोयी-सुविधा मिळतात हे पाहुया...
राहुल गांधींना दिल्लीतील लुटियन झोन परिसरातील बंगला मिळाला आहे. यासह नोकर, चारचाकी आणि चालक देखील असतात.
राहुल गांधी विरोधीपक्षनेते पदावर असले तरी त्यांचा पगार केंद्रीय मंत्र्याएवढा असतो. यासोबतच भत्ते आणि इतर सुविधाही त्यांना मिळतात.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते हे पद कॅबिनेट मंत्र्याच्या बरोबरीचे असते. ही पद खूप महत्त्वाचे मानली जाते. या पदावर असलेल्या व्यक्तीला केंद्रीय मंत्र्याएवढे वेतन, भत्ते आणि इतर सुविधा मिळतात.
राहुल गांधींनी त्यांनी किती पगार मिळतो यांची पावतीच दाखवली आहे. त्यावरून राहुल यांना 2 लाख 30 हजार पगार आहे.
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून वायनाडच्या पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून दिलेल्या पावतीच दाखवली आहे तसेच त्यांनी लोकांना मदतीचे आवाहन केले आहे.