Roshan More
एसआयआरनतंर निवडणूक आयोगाने आता विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SSR) मोहीम सुरु केली आहे. याद्वारे विद्यमान मतदार यादीची पुनर्रचना करून नवीन पात्र मतदारांची नावे समाविष्ट केली जातात.
'SIR' (विशेष सखोल पुनरीक्षण) मध्ये मतदार यादीची अत्यंत बारकाईने, घरोघरी जाऊन सखोल तपासणी आणि पडताळणी केली जाते. याउलट 'SSR' मध्ये प्रामुख्याने नाव जोडणे, पत्यातील दुरुस्ती किंवा त्रुटी सुधारण्यासाठी मतदारांकडून अर्ज मागवून यादी अद्ययावत केली जाते.
१ जानेवारी २०२७ ही मुख्य पात्रता तारीख निश्चित करण्यात आली आहे. ज्या तरुणांचे वय १ जानेवारी २०२७ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण होणार आहे, ते सर्वजण मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी अर्ज करू शकतात.
निवडणूक आयोगाने केवळ १ जानेवारी २०२७ ची अट असणाऱ्यांसाठीच नव्हे, तर २०२७ मधील पुढील तीन पात्रता तारखांना १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुणांनाही आधीच (Advance) अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. यामुळे तरुणांना ऐनवेळी धावपळ करावी लागणार नाही.
नाही, ज्यांचे नाव आधीपासूनच मतदार यादीत योग्य आहे आणि ज्यांच्या माहितीत कोणताही बदल नाही, त्यांना पुन्हा कागदपत्रे जमा करण्याची अजिबात गरज नाही. मात्र, सर्व मतदारांनी प्रसिद्ध होणाऱ्या मसुदा (Draft) यादीत आपले नाव तपासावे.
जर तुमचे नाव यादीतून सुटले असेल, नावात किंवा पत्यात चूक असेल, अथवा तुम्हाला मतदार कार्ड हस्तांतरित करायचे असेल, तरच तुम्हाला संबंधित फॉर्म भरावा लागेल. तसेच निवडणूक अधिकाऱ्याकडून काही विशेष सूचना मिळाल्यास दिलेल्या निर्देशांचे पालन करावे लागेल.