Rashmi Mane
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या निर्णयानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
शाहबाज शरीफ यांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल आणि त्यांच्याशी संबंधित काही मनोरंजक गोष्टींबद्दल सांगणार आहोत.
शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे भाऊ आहेत. पंतप्रधान होण्यापूर्वी शाहबाज हे पाकिस्तानच्या राष्ट्रीय असेंब्लीमध्ये विरोधी पक्षाचे नेते होते.
शेहबाजचा जन्म लाहोरमध्ये एका पंजाबी भाषिक काश्मिरी कुटुंबात झाला.
शाहबाजच्या वडिलांचे नाव मोहम्मद शरीफ आहे आणि ते एक व्यापारी आणि उद्योगपती होते.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर, शाहबाजने कौटुंबिक व्यवसायात काम करायला सुरुवात केली.
राजकीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, शाहबाज १९८८ मध्ये पंजाब प्रांतीय असेंब्लीवर निवडून आले होते.