Rashmi Mane
भारताचा पहिला नागरिक म्हणजे राष्ट्रपती. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीशिवाय देशात अनेक गोष्टी अंमलात आणणे अशक्य असते. पण त्यांच्याविषयी एक रंजक गोष्ट माहीत आहे का?
पंतप्रधान पदाची शपथ राष्ट्रपती देतात ही गोष्ट आपल्याला माहिती असते. पण...
राष्ट्रपतींना शपथ कोण देते? हे तुम्हाला माहीत आहे का?
कोणत्याही संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तींना शपथविधी प्रक्रियेतून जावे लागते.
उत्तर आहे – भारताचे Chief Justice! भारतीय संविधानानुसार, भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे Chief Justice (मुख्य न्यायाधीश) राष्ट्रपतीला शपथ देतात.
सामान्यतः राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडतो.
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 60 नुसार राष्ट्रपतीची शपथ प्रक्रिया निश्चित केली आहे.