Rashmi Mane
अनेक तरूणांचे भारतीय हवाई दलात पायलट बनण्याचे स्वप्न असते. मात्र योग्य मार्गदर्शनाअभावी त्यांना योग्य मार्ग मिळत नाही.
हवाई दलात भरती होण्यायाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेसह भरती प्रक्रियेबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
भारतीय हवाई दलात (indian air force) सामील व्हायचे आहे आणि लढाऊ विमाने/विमान उडवण्याचे स्वप्न आहे. तर तुम्ही बारावीनंतरच त्यासाठी तयारी करू शकता.
भारतीय हवाई दलात भरतीसाठी एअरफोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट घेतली जाते.
12वी नंतर भारतीय हवाई दलात सामील होण्यासाठी AFCAT (Air Force Common Admission Test) तुम्हाला हवाई दलात असेल तर त्यासाठी AFCAT ही टेस्ट पास करावी लागते.
गुणवत्ता यादीत स्थान मिळवले तर तुम्हाला हवाई दलात भरती होण्याची संधी मिळते. ही परीक्षा दरवर्षी संघ लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे आयोजित केली जाते.
NDA मध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराने भौतिकशास्त्र(physics), रसायनशास्त्र (chemistry )आणि गणित(maths )विषयांसह 12वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
यासोबतच उमेदवाराचे किमान वय 16 वर्षांपेक्षा कमी आणि 19 वर्षांपेक्षा जास्त नसावे.