Mangesh Mahale
इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरी (सरकारी नोकरी) करण्याची प्रत्येकाची इच्छा असते.
आयबीची नोकरी ही तरुणांमध्ये सर्वाधिक पसंतीची नोकरी आहे.
सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी (एसीआयओ) हे कार्यकारी पद खरोखरच प्रतिष्ठेचे पद मानले जाते. या पदासाठी भरती प्रक्रिया सध्या सुरु आहे.
राष्ट्रीय सुरक्षेबाबतची गुप्त माहिती जमा करणे,राज्य, देशाला हानी पोहचविणाऱ्या यंत्रणा, व्यक्तींची माहिती हे अधिकारी जमा करतात.
अनेक जण आयबी भरती परीक्षेला बसतात. तुम्हीही आयबी एसीआयओचे उमेदवार आहात का? तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे.
मुळ पगार हा 35 हजार, 370 रुपये असतो. अन्य सुविधा, भत्ते वेगळे मिळतात.
शहर, महानगरानुसार अधिकाऱ्यांना राहण्याच्या, आरोग्याच्या सुविधा मिळतात.
सातव्या केंद्रीय वेतन आयोगानुसार(₹44,900 – ₹1,42,400) वेतनश्रेणीसह केंद्र सरकारच्या इतर सवलतींचाही समावेश आहे.