Amit Ujagare
पीएमओ अर्थात पंतप्रधान कार्यालय आता नव्या इमारतीत शिफ्ट झालं असून त्याला 'सेवा तीर्थ' असं संबोधण्यात येत आहे. शुक्रवारी PM मोदींच्या हस्ते याचं लोकार्पण करण्यात आलं.
कर्तव्य भवनाचंही यावेळी लोकार्पण करण्यात आलं त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या जुन्या 'पीएमओ'तून नव्या 'सेवा तीर्थ'मध्ये स्थलांतर केलं आहे.
या सेवा तीर्थची काय खासियत आहे हे पाहुयात. याच्या नावावरुनच ही जनतेच्या सेवेसाठीची पवित्र जागा असं म्हणता येऊ शकेल.
'सेवा तीर्थ' हे अत्याधुनिक सुविधांनी युक्त असं स्मार्ट नागरिक केंद्रीत प्रशासकीय कॉम्प्लेक्स आहे.
या इमारतीत पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय, कॅबिनेट सचिवालय असणार आहेत.
यापूर्वी पीएमओ हे साऊथ ब्लॉक (रायसीना हिल) इथं होतं, आता ते कर्तव्य पथाजवळील नव्या कॉप्लेक्समध्ये शिफ्ट झालं आहे.
या नव्या इमारतीत देवनागरी लिपित सेवा तीर्थ असं लिहिलं असून त्याखाली 'नागरिक देवो भव' असं लिहिलेल आहे.
नवी दिल्लीतील 'सेन्ट्रल व्हिस्टा' प्रोजेक्टमध्ये इतर इमारतींपैकी ही 'सेवा तीर्थ' नावाची इमारत उभारण्यात आली आहे. याच्या बांधकामाला १२०० कोटी रुपयांचा खर्च आल्याचं सांगितलं जातं.