Roshan More
भारत पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीमध्ये टेरिटोरियल आर्मी सक्रिय करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
टेरिटोरियल आर्मी हे अर्धसैनिक बल आहे. ज्यात सामन्य नागरिकांना सैन्याचे प्रशिक्षण दिलेले असते. अनेक मोठ्या मोहिमांमध्ये टेरिटोरियल आर्मी सहभाग घेत असते.
या आर्मीची स्थापना 18 ऑगस्ट 1948 ला करण्यात आली.
प्रारंभी सहा महिन्याचे प्रशिक्षण दिले जात. त्यानंतर दरवर्षी दोन महिन्यांचा ट्रेनिंग कॅम्प असतो.
या आर्मीत मानद लेफ्टनंट, कर्नल, कॅप्टन ही पदे दिली जातात. भारतीय सिनेमातील स्टार, क्रिकेटचे खेळाडू हा आर्मीचा भाग आहेत.
कपिल देव यांना या आर्मीत लेफ्टनंट कर्नल हा रँक देण्यात आला आहे.
महेंद्र सिंग धोनी हा देखील या आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल आहे.
अभिनेता नाना पाटेकर हा या आर्मीचा भाग असून त्याला कॅप्टन रँक आहे.