Rashmi Mane
Gen Z ही केवळ फॅशन किंवा ट्रेंड फॉलो करणारी पिढी नाही. ही पिढी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यावर विश्वास ठेवते. जुन्या चौकटी मोडून स्वतःचे नियम बनवणे हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे.
Gen Z लोक इतरांना प्रभावित करण्यापेक्षा स्वतःसारखे राहणे पसंत करतात. सोशल मीडियावरही ते खऱ्या आयुष्यातील क्षण शेअर करण्याला अधिक महत्त्व देतात.
महागड्या वस्तू खरेदी करण्यापेक्षा नवीन ठिकाणे पाहणे, प्रवास करणे, नवीन गोष्टी शिकणे आणि वेगळे अनुभव घेणे Gen Z ला अधिक आवडते.
ही पिढी मानसिक आरोग्य, ताणतणाव आणि भावनिक संतुलन यावर खुलेपणाने बोलते. गरज वाटल्यास मदत घेण्यात त्यांना कमीपणा वाटत नाही.
प्लास्टिकचा कमी वापर, पुनर्वापर, पर्यावरणपूरक वस्तूंची निवड आणि शाश्वत जीवनशैलीकडे Gen Z चा कल वाढताना दिसतो.
नवीन तंत्रज्ञान, ऑनलाइन कोर्स, डिजिटल कौशल्ये आणि सतत स्वतःला अपडेट ठेवणे ही Gen Z ची मोठी ताकद आहे.
ही पिढी फक्त पैशासाठी काम करण्यापेक्षा आनंद, छंद, कुटुंब आणि वैयक्तिक आयुष्यालाही तितकेच महत्त्व देते.
आत्मविश्वास, नवे विचार, सामाजिक जाणीव, डिजिटल कौशल्ये आणि स्वतःची वेगळी ओळख जपण्याची वृत्ती यामुळे Gen Z आजच्या काळातील सर्वात वेगाने बदल घडवणारी आणि सुपरकूल पिढी म्हणून ओळखली जात आहे.