Roshan More
काँग्रेसने 'वन नेशन वन इलेक्शन'ला विरोध केला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आपली लोकशाही टिकवायची असेल तर गरजेनुसार निवडणुका झाल्या पाहिजेत, हे संविधानाच्या विरोधात आहे, असे ते म्हणाले.
लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडी पक्षाने वन नेशन, वन इलेक्शन’ला विरोध केला आहे.
एनडीएचा घट असलेल्या जेडीयूने मोदींचे समर्थन करत वन नेशन, वन इलेक्शन’ला समर्थन दिले आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते, केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी 'वन नेशन वन इलेक्शन'ला विरोध केला आहे. 'वन नेशन वन इलेक्शन' ही संकल्पना भारताची संघराज्य संरचना कमकुवत करणारी आहे, असे ते म्हणाले.
बहुजन समाजवादी पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी 'वन नेशन वन इलेक्शन'ला पाठींबा दिला आहे.
एमआयएमआयएम पक्षाचे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांनी वन नेशन वन इलेक्शनला विरोध केला आहे.
एनडीएचा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने नेशन वन इलेक्शने समर्थन करत या निर्णयाला पाठींबा दिला आहे
समाजवादी पक्षाने पाठींबा किंवा थेट विरोध न करता भाजपवर टीका केली आहे. आधी भाजपने स्वतःच्या अध्यक्षाची निवडणूक घ्यावी मग वन नेशन वन इलेक्शनच्या बाता माराव्यात, अशी टीका सपाने केली आहे.