Roshan More
राज्याचा घटनात्मक प्रमुख हा राज्यपाल असतो. त्यामुळे राज्यपाला किती आणि कोणते अधिकार असतात ते पाहूया
राज्यपाल हा राज्याच्या नामधारी प्रमुख असतो. खरी सत्ता ही मुख्यमंत्र्यांच्या आणि मंत्रिमंडळाच्या हाती असते.
राज्याचा सर्व कारभार राज्यपालांच्या नावाने चालतो. मुख्यमंत्री व मंत्र्यांची नेमणूक, महाधिवक्ता आणि राज्य लोकसेवा आयोग सदस्यांची नियुक्ती ते करतात.
विधिमंडळाचे अधिवेशन बोलावणे व तहकूब करणे. विधेयकांवर स्वाक्षरी देणे, ती राखून ठेवणे किंवा राष्ट्रपतींकडे पाठवणे. अधिवेशन नसताना वटहुकूम काढण्याचा अधिकारही त्यांना आहे.
राज्यपालांच्या पूर्वपरवानगीशिवाय अर्थसंकल्प किंवा 'धनविधेयक' विधानसभेत मांडता येत नाही. आकस्मिक निधीतून तातडीच्या खर्चासाठी मंजुरी देण्याचा अधिकारही त्यांच्याकडे आहे.
राज्यपालांकडे न्यायिक अधिकारही असतो. मृत्यूदंडाची शिक्षा वगळता राज्याच्या कायद्याखाली गुन्हा सिद्ध झालेल्या व्यक्तीची शिक्षा कमी करणे, स्थगित करणे किंवा माफ करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे.
सत्ता स्थापनेसाठी आधी कोणत्या पक्षाला निमंत्रित करायचे, बहुमत चाचणी घेणे किंवा राष्ट्रपती राजवटीची शिफारस करणे अशा वेळी ते स्वतःच्या विवेकानुसार निर्णय घेऊ शकतात.
मुख्यमंत्र्यांनी बहुमत गमावले असूनही ते राजीनामा देण्यास नकार देत असतील, तर राज्यपाल त्यांना सभागृहात बहुमत सिद्ध करण्यास सांगू शकतात किंवा त्यांना पदावरून बरखास्त करू शकतात.
फडणवीस सरकारचा जमीन व्यवहाराबाबत मोठा निर्णय; आयकर विभागाला जाणार 'ब्लॅक मनी'ची माहिती