Deepak Kulkarni
एखाद्या व्यक्तीच्या हातून जेव्हा कोणताही गुन्हा घडतो,तेव्हा पहिल्यांदा त्याला अटक करुन पोलिस त्याच्यावर गुन्हा दाखल करतात.
पोलिस त्या गुन्हेगाराला अटक केल्यानंतर कोर्टात हजर करतात. यानंतर संबंधित गुन्हेगाराला कोर्ट पोलिस किंवा न्यायालयीन कोठडी सुनावते.
या काळात किंवा एखाद्या गुन्ह्यात कोर्टानं शिक्षा ठोठावल्यानंतर जर कोणताही कैदी जेलमधून पळाला तर त्याच्यावर कोर्ट काय निर्णय देतं, चला जाणून घेऊयात.
भारतीय संविधानाच्या तरतुदीनुसार, सर्वात आधी कैद्याला तुरुंगातून पळून जाण्याच्या गुन्ह्याखाली 224 कलमानुसार शिक्षा सुनावली जाते.
कैद्याला पळवण्याचा प्रयत्न केला तर संबंधितांवर कलम 222, 225 च्या अंतर्गत कारवाई करण्यात येते.
कैदी पळाल्यावर जर पोलिसांनी त्याला परत अटक केली,तर त्याची रवानगी पुन्हा तुरुंगात होतेच,शिवाय पळून जाण्यासाठी घालवलेला वेळ त्याच्या शिक्षेत जोडला जात नाही.
पळून गेल्याचा गुन्हा कैद्याच्या पहिल्या शिक्षेत जोडला जातो .
सर्वात महत्त्वाची बाब भारतीय दंड संहितेच्या कलम 226 नुसार जेलमधून पळून जाणे किंवा पळून जाण्याचा प्रयत्न करणे याबाबत संंबंधित कैद्याला 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा तो भोगत असलेली शिक्षा आणि जेलमधून पळून जाण्याची या दोन्ही शिक्षा भोगाव्या लागतात.
कैद्याला यामुळे जामीन मंजूर होण्यास अनेक अडचणी येतात.तसेच कैद्यानं पळून जाताना कोणताही अनुचित प्रकार केला असेल तर त्यासाठीही त्याला वेगळी शिक्षा सुनावली जाते.