Deepak Kulkarni
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी केलेल्या मोठ्या आंदोलनामुळे मनोज जरांगे पाटील यांचे नाव राज्याच्या राजकारणात चांगलेच चर्चेत आले.
मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून महाराष्ट्र ढवळून काढला आहे.
बेमुदत उपोषणाचं हत्यार उपसून त्यांनी सरकारला जेरीस आणलं आहे.
सरकारला दिलेली आरक्षणासाठीची मुदत संपल्यानंतर आता मुंबईत 20 जानेवारीपासून मोठं आंदोलन उभारणार असल्याचे जाहीर केले.
जरांगे यांच्या संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतानाच गर्दीचे विक्रम मोडीत काढत सभा घेतल्या.
नेत्यांच्याही सभेला होणार नाही एवढी गर्दी जरांगे पाटील यांच्या सभेला होत आहे.
त्यांच्या पाठीमागचा जनाधार पाहता जरांगे पाटील राजकारणात येणार असल्याची चर्चा सुरू आहे.
इतकेच नाहीतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांना राजकारणात यावं असा सल्ला दिला आहे.जलील यांच्यासह अनेकांनी त्यांनी राजकारणात यावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.
समाज मला राजकारणात आणणार असेल तर मग मी हिमालयात जाईन. मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर मी हिमालयात जाणार आहे. पण राजकारणात येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.