सरकारनामा ब्यूरो
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नवी दिल्ली येथे आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेले नवीन आणि भव्य कार्यालय बांधले आहे. याचे उद्घाटन 19 फेब्रुवारीला शिवजंयती सोहळ्या दिवशी होणार.
आरएसएस कार्यालय सुमारे 4 एकर क्षेत्रात पसरलेले आहे. संघाची नवीन इमारत 13 मजली आहे आणि त्यात एकूण 300 खोल्या आणि कार्यालये आहेत.
RSS कार्यालयाला नाव केशव कुंज ठेवण्यात आले आहे. हे नाव संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या नावावरून आले आहे.
हे भव्य कार्यालय बांधण्यासाठी सुमारे 150 कोटीचा खर्च आला असून येथे असणाऱ्या तीन हाॅलला साधना, प्रेरणा आणि अर्चना असे नावे देण्यात आली आहेत.
तीन हाॅलपैकी एक हाॅलमध्ये जवळजवळ 463 पदाधिकाऱ्यांना बसण्यासाठी जागा आहेत. तर बाकीच्या दोन हाॅलमध्ये 650 ते 250 इतके लोक एकत्रित बसू शकतील.
कार्यालयात पदाधिकारी आणि सदस्यांना राहण्याची उत्तम सोय केली असून येथे लायब्रेरी बांधण्यात आली आहे. या लायब्रेरीत 8 हजार पुस्तके असून ती सर्वसामान्य लोकांनाही वाचण्यास उपलब्ध असणार आहे.
वैद्यकीय सुविधांसाठी तळमजल्यावर छोटे क्लिनिक बांधण्यात आले असून याचा लाभ सर्वसामान्य जनताही घेऊ शकणार आहे. तसेच येथे 5 बेडचे छोटे रुग्णालय देखील बनवले आहे.
कार्यलयात एकूण 270 वाहनांच्या पार्किंगसाठी तळ मजल्यावर राखीव जागा ठेवली आहे.