Ganesh Sonawane
1 जानेवारी 2027 पासून SIM बायडिंग नियमांचा परिणाम दिसू शकतो. WhatsApp, Telegram आणि Signal सारख्या अॅप्सच्या वापरावर या नियमांचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
तुम्ही ज्या नंबरवर WhatsApp वापरता, त्या नंबरचे SIM कार्ड त्याच फोनमध्ये असणे म्हणजे SIM बायडिंग. यामुळे वापरकर्त्याची ओळख पडताळण्यास मदत होईल.
दूरसंचार विभागाने नोव्हेंबर 2025 मध्ये अनेक मेसेजिंग अॅप्ससाठी SIM बायडिंगसंबंधी निर्देश जारी केले. कंपन्यांना नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी 31 डिसेंबर 2026 पर्यंत मुदत देण्यात आल्याचे वृत्त आहे.
नाही, सर्वांचे WhatsApp अचानक बंद होणार असा याचा अर्थ नाही. प्रत्यक्ष परिणाम अॅप कंपन्या नियमांची अंमलबजावणी कशी करतात आणि SIM पडताळणी कशी होते, यावर अवलंबून असेल.
एका फोनमध्ये SIM ठेवून दुसऱ्या फोनवर त्याच नंबरचे WhatsApp वापरणाऱ्यांना अडचणी येऊ शकतात. विशेषतः ज्या फोनमध्ये संबंधित SIM नाही, तिथे अॅप वापरण्याच्या पद्धतीत बदल होण्याची शक्यता आहे.
केवळ Wi-Fi वर चालणाऱ्या टॅबलेट किंवा जुन्या फोनवर मेसेजिंग अॅप वापरणाऱ्यांना नव्या नियमांचा परिणाम जाणवू शकतो. मात्र, लिंक्ड डिव्हाइसची सुविधा कशी सुरू राहील, हे संबंधित अॅपच्या नियमांवर अवलंबून असेल.
SIM कार्ड आणि मोबाइल नंबर यांचा संबंध पडताळून सायबर फसवणूक रोखण्यास मदत होईल, असा सरकारचा उद्देश आहे. मात्र, या उपायामुळे मेसेजिंग अॅप्सची सुरक्षा किती वाढेल, याबाबत चर्चा आहे.
अनेक छोटे व्यापारी ग्राहकांचे संदेश आणि ऑर्डर हाताळण्यासाठी वेगवेगळे फोन किंवा संगणक वापरतात. SIM बायडिंगमुळे त्यांच्या कामाच्या पद्धतीत बदल करावा लागू शकतो; नेमका परिणाम अॅपच्या अंतिम नियमांवर अवलंबून असेल.