SIR नंतर आता नवीन नाव नोंदणी, स्थलांतर, नाव बदल कधी करता येणार?

Amit Ujagare

SIR प्रक्रिया

महाराष्ट्रात निवडणूक आयोगाकडून मतदार यादी सखोल परीक्षण प्रक्रिया (SIR) राबवण्यात आली. यानंतर आता लवकरच याची प्रारुप अर्थात तात्पुरती यादी प्रसिद्ध होणार आहे.

Maharashtra SIR

अंतिम यादी

या यादीतून जर योग्य कारणाअभावी नाव वगळली गेली असतील तर त्यावर आलेल्या आक्षेपांवरच पुन्हा प्रक्रिया केली जाणार आहे. त्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

Maharashtra SIR

नवी अपडेट

पण आता ही SIR ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढे काय प्रक्रिया करता येतील, याबाबत नवी अपडेट निवडणूक आयोगानं दिली आहे. त्यानुसार, वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्यांची नवीन नाव नोंदणी, स्थलांतर झाल्यास पत्ता बदल आणि नावामध्ये बदल या प्रक्रिया करता येणार आहेत.

Maharashtra SIR

फॉर्म क्र. ६

या नव्या अपडेटनुसार, जर नवीन नाव नोंदणी करायची असेल तर त्यासाठी नवा अपडेट झालेला फॉर्म क्रमांक ६ भरावा लागणार आहे.

Maharashtra SIR

फॉर्म क्र. ८

त्याचबरोबर जर पत्ता बदल आणि नावात बदल असेल तर त्यासाठी फॉर्म क्रमांक ८ भरुन द्यावा लागेल, पण त्यासोबत २००२ च्या मतदार यादीतील पुराव्यासह हा फॉर्म निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर ऑनलाईन स्वरुपातही भरता येईल.

Maharashtra SIR

मुख्य निवडणूक अधिकारी

राज्य निवडणूक आयोगाचे अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी ही नवी अपडेट दिली आहे.

Maharashtra SIR

मुदतवाढ

दरम्यान, SIRची मुदत आता १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यानंतर २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

Maharashtra SIR

अंतिम मतदार यादी

ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२६ पर्यंत यावर दावे किंवा आक्षेप नोंदवता येणार आहेत. तसंच पुढे समांतर पद्धतीनं २२ ऑक्टोबरपर्यंत हे दावे निकाली काढले जाणार आहेत. त्यानंतर २७ ऑक्टोबर २०२६ ला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

Maharashtra SIR