Pradeep Pendhare
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वन नेशन वन इलेक्शन' विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान सुरू आहे.
भाजपच्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने संसदेत 'वन नेशन वन इलेक्शन' विधेयक मांडले आहे.
भारतात पहिल्यांदा 'वन नेशन वन इलेक्शन' कधी झाले? याची चर्चा रंगली आहे.
देशाच्या स्वातंत्र्यानंतर भारतात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका अनेकदा एकत्र झाल्या आहेत.
देशात पहिल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र 1952 मध्ये झाल्या होत्या.
यानंतर 'वन नेशन वन इलेक्शन', म्हणजेच 1957, 1962 आणि 1967 मध्ये एकाचवेळी निवडणुका झाल्या.
देशातील केरळ राज्य असे आहे की, तिथे निवडणुका काही कारणांमुळे वेगळी झाली होती.
इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यावर 'वन नेशन वन इलेक्शन' ही संकल्पना थांबली.
1971 मध्ये लोकसभेच्या आणि 1972 मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या.