सरकारनामा ब्यूरो
जाणून घेऊयात मुघलाचे वंशज भारतात कुठे राहतात आणि त्यांना किती पेन्शन दिली जाते.
कोलकातामधील हावडा येथील रहिवासी असलेल्या सुलताना बेगम या दावा सांगतात की, त्या बहादूर शहा जफर यांच्या पणतूच्या पत्नी आहेत.
सुलताना बेगम म्हणतात की, त्यांचा जन्म लखनऊ मध्ये झाला होता, पण त्यांच्या आजोबांनी त्यांना कोलकाता येथे आणले. त्यामुळे त्यांचे संपूर्ण आयुष्य येथेच गेले.
सुलताना यांचे लग्न कोलकाता येथे झाले असून, त्यांच्या पतीचे नाव प्रिन्स मोहम्मद मिर्झा होते. मुघलांचा शेवटचा शासक बहादूर शहा जफर यांचे ते पणतू असल्याचे त्या सांगतात.
पंडित जवाहरलाल नेहरु यांना कळल्यानंतर 1960 पासून त्यांना पहिली बहादुर शहाच्या पणतूसाठीची 250 रुपये पेन्शन देण्याचे मंजूर झाले होते.
सुलताना बेगम यांनी सांगितले की, त्यांना राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या भेटीसाठी नेण्यात आले होते. त्यावेळी 10 हजार रुपयांच्या पेन्शनची मिळावी अशी मागणी केली होती.
सुलताना बेगम यांना सध्या दरमहा 6 हजार रुपये इतकी पेन्शन मिळते. पण एवढ्या पैशांमध्ये त्यांचे घर भाडे, खर्च निघत नाही. त्यामुळे त्या बूक बाइंडिंग,विणकाम आणि बांगड्या बनवण्याचा व्यवसाय करतात.
प्रिन्स बेदर बख्त यांचा जन्म 1920 ला रंगून येथे झाला असून, ब्रिटिशांनी त्यांना घर, नोकरी आणि राहण्यासाठी जागा दिली होती.बेदर बख्त यांना भारतात लपवून आणण्यात आले होते. असे सुलताना बेगम सांगतात.