सरकारनामा ब्यूरो
मायक्रोसॉफ्टच्या 50 व्या वर्धापनदिन कार्यक्रमात मायक्रोसॉफ्टचे प्रमुख बिल गेट्स, मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नडेला आणि स्टीव बाल्मर उपस्थित होते.
50 व्या वर्धापनदिन कार्यक्रमा दरम्यान भारतीय वंशाच्या अमेरिकन सॉफ्टवेअर इंजिनिअर वानिया अग्रवाल यांनी मोठी गोधळ निर्माण केला.
मायक्रोसॉफ्टच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त काही मोठ्या व्यक्तीचे नावे घेत पॅलेस्टिनी लोकांचे "रक्तरंजित"साजरे करत असल्याचा आरोप करत तिने कंपनीतून राजीनामा दिला आहे.
मायक्रोसॉफ्ट तंत्रज्ञानामुळे गाझामधील 50 हजार पॅलेस्टिनी लोक मारले गेले. इस्रायल संरक्षण मंत्रालयासोबत मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड आणि एआय करारावर बोलत, त्यांच्या मृत्यूचा आनंद साजरा करत आहेत याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे, असे ती यावेळी म्हणाली.
वानिया हिने अॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीमधून सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले असून ती सध्या अमेरिकेतील वॉशिंग्टनमधील सिएटल येथे वास्तव्यास आहेत.
2012 मध्ये तिने दोन वर्षे Etsy वर एक छोटासा बिजनेस केला. यानंतर 2014 ला काही महिने तिने फार्मसी तंत्रज्ञ म्हणून काम केले.
2016 ला तिने इलिनॉयमधील नेपरविले येथे वैद्यकीय सहाय्यक म्हणून केले. वानियांने वर्षाहून अधिक दिवस अॅमेझानमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर म्हणून काम केले.
मायक्रोसॉफ्ट कंपनीत नोकरीला लागत आर्टिफिशियल इंटेलिजेंस विभागात सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून वानिया अग्रवाल काम करत होत्या.