LPG Cylinder: भारतात एलपीजीचे सर्वात मोठे उत्पादन होणारं शहर कोणतं आहे? जाणून घ्या सविस्तर...

Deepak Kulkarni

एलपीजी गॅसची मोठी टंचाई

इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यात पेटलेल्या युद्धामुळे महाराष्ट्रासह भारतात एलपीजी गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. ज्यामुळे गॅस सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा आणि हॉटेल व्यवसायावर परिणाम झाला आहे.

LPG cylinder production India | Sarkarnama

हॉटेल बंद

इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी हॉटेल बंद ठेवले आहे, तर नेहमीचे सर्व खाद्यपदार्थ महागले आहेत.

LPG cylinder production India | Sarkarnama

सर्वाधिक उत्पादन

गॅस टंचाई निर्माण झाल्यामुळे  अनेक ठिकाणी ऑनलाईन गॅस बुकिंग सेवा बंद पडली असून ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परंतू भारतात सर्वाधिक एलपीजी गॅसचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या शहरात होतं, माहिती आहे...?

LPG cylinder production India | Sarkarnama

जामनगर

गुजरात राज्यातील जामनगर शहरात भारतात एलपीजी गॅसचे सर्वाधिक उत्पादन होते.

LPG cylinder production India | Sarkarnama

मोठे रिफायनरी संकुल

जामनगरमधील रिफायनरी संकुल जगातील सर्वात मोठे रिफायनरी संकुलपैकी एक आहे. या ठिकाणी कच्च्या तेलावर प्रक्रिया करून मोठ्या प्रमाणात एलपीजी, पेट्रोल आणि डिझेल तयार केले जाते.

LPG cylinder production India | Sarkarnama

या शहरांचंही योगदान

जामनगरसह वडोदरा, मथुरा, पानिपत आणि हल्दिया येथेही रिफायनरीमध्येही मोठ्या प्रमाणात एलपीजी गॅसची निर्मिती होते.

LPG cylinder production India | Sarkarnama

पर्यायी इंधन

भारतातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या इंधनांपैकी एलपीजी हे एक आहे. घरांतील स्वयंपाक, उद्योग विश्व आणि वाहनांमध्ये पर्यायी इंधन म्हणून एलपीजीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

LPG cylinder production India | Sarkarnama

मोठ्या ग्राहकांपैकी एक

सध्याच्या काळात भारताचा समावेश हा जागतिक पातळीवर एलपीजी गॅसचा वापर करणारा मोठ्या ग्राहकांपैकी एक ओळखला जातो. या देशात रोज लाखो कुटुंबे एलपीजी सिलिंडर वापर करतात.

LPG cylinder production India | Sarkarnama

40 % LPGचे देशांतर्गत उत्पादन

भारत आपल्या गरजेच्या फक्त 40 % एलपीजीचे देशांतर्गत उत्पादन करतो, तर उर्वरित गॅस हा आयात केला जातो.

LPG cylinder production India | Sarkarnama

NEXT इराण युद्ध अंगलट? डोनाल्ड टॅम्प यांचे संरक्षणाला प्राधान्य, खर्च दीड ट्रिलियन डाॅलर्सपर्यंत नेला

US Defense Budget $1.5 Trillion | Sarkarnama
येथे क्लिक करा...