Pariksha Pe Charcha : 4.5 कोटीमधून सांगलीच्या प्रणवची निवड, पंतप्रधान मोदींसोबत 'परीक्षा पे चर्चा; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

Narendra Modi Pranav Bhosale : प्रणवच्या निवडी बद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ही झालेली निवड आपल्या प्रत्येकाचे हृदय अभिमानाने भरून टाकणारी आहे.
Pranav Bhosale from Sangli interacts with Prime Minister Narendra Modi during the Pariksha Pe Charcha program, earning praise from state leaders.
Pranav Bhosale from Sangli interacts with Prime Minister Narendra Modi during the Pariksha Pe Charcha program, earning praise from state leaders.sarkarnama
Published on
Updated on

Narendra Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या 'परीक्षा पे चर्चा 2026' साठी देशभरातील तब्बल 4.5 कोटी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या स्पर्धेतून देशभरातून केवळ 36 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

यात महाराष्ट्रातून एकमेव विद्यार्थी म्हणून सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील अजितराव घोरपडे विद्यालय, कळंबी येथील 10 वीचा विद्यार्थी प्रणव भोसलेची निवड झाली आहे. त्याने आज पंतप्रधान मोदींशी 'परीक्षा पे चर्चा' या संवाद कार्यक्रमात भाग घेतला.

प्रणवच्या निवडी बद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ही झालेली निवड आपल्या प्रत्येकाचे हृदय अभिमानाने भरून टाकणारी आहे. ग्रामीण भागातील शाळेत शिकणारा आपला मुलगा थेट मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याशी संवाद साधणार... ही संधी केवळ प्रणवसाठीच विशेष नाही, तर यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वप्नाला नवे बळ मिळणार आहे.

प्रणवसोबत विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. एन. पाटील यांनाही या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. प्रणवचे व त्याला घडवणाऱ्या पालकांचे, शिक्षकांचे आणि त्याच्या विद्यालयाच्या संपूर्ण परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

Pranav Bhosale from Sangli interacts with Prime Minister Narendra Modi during the Pariksha Pe Charcha program, earning praise from state leaders.
Rajya Sabha election 2026 : शरद पवार राज्यसभा लढवणार? संजय राऊत म्हणाले 'त्यांची मानसिकता थांबण्याची, पण कुणासमोर हात पसरायची...'

अजून 25 वर्ष बाकी आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना एका विद्यार्थ्यांने त्यांना त्यांच्या वाढदिवसा दिवशी आपला ही वाढदिवस असल्याचे सांगितले. त्यावर पंतप्रधानांनी

मोदींनी सांगितले की, ‘’१७ सप्टेंबरला माझा वाढदिवस होता. एका नेत्याने मला फोन केला आणि शुभेच्छा देत तुम्ही ७५ वर्षांचे झालात.’ असे म्हटले. त्यावर मी मी त्यांना म्हटले, अजून २५ वर्षे बाकी आहेत.’’, असे सांगितले.

Pranav Bhosale from Sangli interacts with Prime Minister Narendra Modi during the Pariksha Pe Charcha program, earning praise from state leaders.
DSP Kalpana Verma : लेडी DSP चा 'हनीट्रॅप' गेम; डायमंड रिंग, लक्झरी कारसह व्यावसायिकाला कोट्यवधींचा गंडा, पोलीस दलात खळबळ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com