Rashmi Mane
रेल्वे प्रवासादरम्यान आपल्याला निळ्या आणि लाल रंगाचे डबे पाहायला मिळतात. हे डबे केवळ रंगानेच नव्हे तर तंत्रज्ञान, वेग आणि सुरक्षिततेतही वेगळे आहेत.
निळे डबे म्हणजे ICF (Integral Coach Factory). याची निर्मिती 1952 पासून चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीत होते.
लाल डबा म्हणजे LHB कोच (Linke Hofmann Busch). तर लाल रंगाचे LHB कोच जर्मनीच्या लिंक-हॉफमन-बुश डिझाइननुसार तयार केले गेले असून 2000 पासून पंजाबमधील कपूरथला रेल्वे कोच फॅक्टरीत बनवले जातात.
ICF (निळा डबा) – ड्युअल बफर सिस्टीम, अपघातात डबे एकमेकांवर चढण्याची शक्यता. LHB (लाल डबा) – सिंगल बफर सिस्टीम, अपघातात डबे वेगळे राहतात. त्यामुळे LHB डबे अधिक सुरक्षित.
ICF कोचची कमाल वेग क्षमता 160 किमी/ता, पण मर्यादा 120 किमी/ता. तर LHB कोचची– कमाल वेग क्षमता 200 किमी/ता, पण मर्यादा 160 किमी/ताशी असते. LHB डबे वेगवान आणि स्थिर असतात.
प्रवासासाठी LHB डबे वेगवान, हलके व सुरक्षित असल्याचे तज्ञांचे मत आहे.
आता काही LHB कोच हलक्या निळ्या रंगातही तयार होत असून त्या हफसफर व शताब्दी एक्सप्रेसमध्ये वापरल्या जातात.