Aslam Shanedivan
संपूर्ण जग नव्या वर्षाच्या स्वागताला सज्ज झालं असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील शिराळे ग्रामस्थ मात्र गाव मोकळं करतात.
संपूर्ण गाव ‘गावपळणी’साठी वेशीबाहेर पडतं आणि निसर्गाच्या सानिध्यात आपला तात्पुरता संसार थाटतो.
याला ४५० वर्षांच्या प्राचीन संस्कृती असून गावच्या जागृत गांगेश्वर देवस्थानच्या आदेशानुसार ग्रामस्थ असे करतात असे म्हटलं जातं
रविवार (२८ डिसेंबर) पासून गावचे आराध्य दैवत श्री गांगेश्वर यांच्या ‘हुकूमाप्रमाणे’ संपूर्ण गावाने घरादाराचा त्याग केलाय.
फक्त लोकचं बाहेर पडले नाहीत तर आपल्यासोबत पाळीव प्राणी, पशुपक्षी आणि आवश्यक अन्नधान्याचा साठा घेतला आहे.
शिराळे ग्रामस्थ शेजारी सडुरे गावाच्या हद्दीतील धोंडोबा डोंगराच्या पायथ्याशी उघड्या माळराणावर झोपड्या बांधल्या असून पुढील 5 दिवस येथे निवारा असेल.
गावपळणीच्या काळात मुलांचे शिक्षण थांबत नाही. प्राथमिक शाळा झाडांच्या सावलीत, निसर्गाच्या सानिध्यात भरविली जाते.
या काळात गावात शांतता राखण्यासाठी अगदी एसटी बसची सेवाही गावात बंद ठेवली जाते.