Rashmi Mane
मोदी सध्या यूकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करारावर (FTA) स्वाक्षऱ्या होणार आहेत, जो दोन्ही देशांसाठी ऐतिहासिक ठरणार आहे.
या करारामुळे 2030 पर्यंत दोन्ही देशांतील व्यापार दुपटीने वाढून 120 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल.
लेदर, ऑटो पार्ट्स, सीफूड, खेळणी, कपडे अशा वस्तूंचा ब्रिटनमध्ये निर्यात कर भरण्याची गरज कमी होईल. त्यामुळे या वस्तू स्वस्त होतील.
व्हिस्की, चॉकलेट्स, सौंदर्यप्रसाधने, वैद्यकीय उपकरणं, लक्झरी कार्स यांसारख्या ब्रिटिश वस्तूंवरील कर कमी होईल.
हा करार लगेच लागू होणार नाही. दोन्ही देशांचे मंत्री स्वाक्षऱ्या करतील, आणि मग ब्रिटनच्या संसदेमध्ये मंजुरी मिळेल.
पंतप्रधान मोदी ब्रिटनचे राजा चार्ल्स तृतीय यांच्याशीही भेट घेणार आहेत.
या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील गुंतवणुकीला नवी चालना मिळेल.
हा दौरा केवळ व्यापारापुरता न राहता, द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जातोय.