Jagdish Patil
भाजप नेते मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
भाजप सोडून शरद पवारांसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरु झालेले पिचड पिता-पुत्र नेमके कोण आहेत ते जाणून घेऊया.
जेष्ठ नेते मधुकरराव पिचड हे शरद पवारांचे जुने सहकारी आणि खंदे समर्थक आहेत.
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून ते पवारांसोबतच असून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत.
2014 साली राष्ट्रवादीच्या तिकीटावर त्यांचा मुलगा वैभव पिचड हे आमदार म्हणून निवडून आले.
2019 साली पिचड पिता-पुत्रांनी भाजपमध्ये प्रवेश आणि त्याच वर्षी वैभव पिचड यांचा पराभव झाला.
महायुतीत मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांची राजकीय अडचण झाल्याची चर्चा आहे.
पवारांच्या भेटीमुळे पिचड पिता-पुत्राची राष्ट्रवादीत घरवापसी होणार की ते भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.