Jagdish Patil
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांच्या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत खळबळजनक खुलासा केला आहे.
देशमुख यांच्यावर खूप दबाव होता. तरीही त्यांनी कुठल्याही प्रतिज्ञापत्रावर सही केली नाही. तरी देखील त्यांना तुरुंगवास भोगावा लागल्याचं श्याम मानव यांनी सांगितलं.
राज्यातील राजकारणात मोठा भूकंप करणारे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट पंगा घेणारे श्याम मानव कोण आहेत? जाणून घेऊया.
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती (ABANS) या संघटनेचं त्यांनी स्थापना केली आहे. ते स्वतः एक YouTube चॅनल चालवतात. या चॅनेलवर ते अंधश्रद्धा, व्यक्तिमत्व विकास यासारख्या विषयांसंदर्भात माहिती देतात.
श्याम मानव यांनी धीरेंद्र शास्त्री यांना देखील आव्हान दिले होतं की, "त्यांनी आपल्यासमोर दरबार लावून चमत्कार करुन दाखवल्यास 30 लाख रुपये देणार."
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांना आव्हान दिल्यानंतर श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
जादूटोणा विरोधी कायद्यासाठी श्याम मानव आणि नरेंद्र दाभोळकर यांनी मोठं योगदान दिलं. गेली 40 वर्ष श्याम मानव अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करत आहेत.
NEXT : बालभारतीमधील 'वन्समोअर'वरून वाद