Roshan More
भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 80 नुसार, राज्यसभा मध्ये 12 सदस्यांना राष्ट्रपती नियुक्त करू शकतात.
या सदस्यांची निवड
यांची निवड साहित्य, विज्ञान, कला आणि सामाजिक सेवा या क्षेत्रांतील योगदानासाठी केली जाते.
भारताचा नागरिक असावा, वय किमान 30 वर्षे तसेच संबंधित क्षेत्रात लक्षणीय कामगिरी असावी.
कोण निवड करतो?
या 12 जागांची नियुक्ती राष्ट्रपती करतो, परंतु केंद्र सरकारच्या शिफारशीवर आधारित असते.
नियुक्त खासदार इतर खासदारांप्रमाणेच कामकाजात भाग घेऊ शकतात, परंतु ते राष्ट्रपती निवडणुकीत मतदान करू शकत नाहीत.
या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो.
राष्ट्रपती नामनिर्देश खासदार म्हणून नुकतेच उज्ज्वल निकम, माजी पराराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला , इतिहासकार डॉ. मीनाक्षी जैन, शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन मास्टर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.