सरकारनामा ब्यूरो
जगभरात वक्फ बोर्डाची जेवढी संपत्ती आहे. त्यामध्ये सर्वाधिक संपत्ती असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो.
2022 पर्यतच्या आकडेवारीनुसार वक्फ बोर्डाकडे 8 लाख 72 हजार स्थावर मालमत्ता, तर अनेक अहवालांनुसार वक्फ बोर्डाकडे 9 लाख 40 हजार एकरांपेक्षा जास्त मालकीची जमीन आहे.
वक्फला दान केलेल्या जमीनमध्ये प्रामुख्याने मशिदी, कबस्तान आणि धार्मिक व सामुदायिक वापरासाठी असलेल्या जमिनीचा समावेश आहे. कोणी दान केल्या आहेत या जमीन आणि मालमत्ता वाचा...
हैदराबादच्या निजामांनी वक्फला सर्वाधिक जमीन दान केल्या असल्याची माहिती मिळते. हैदराबादमध्ये एकूण 10 निजाम होते. यात निजाम-उल-मुल्क आसफ जाह सातवे यांनी हजारो एकरची जमीन वक्फला दान केली होती.
यदागिरिगुट्टा मंदिर, तिरुपती मंदिर आणि अमृतसरमधील सुवर्ण मंदिर असा प्रमुख मंदिराला निजाम उस्मान अली खान यांनी वक्फला संपत्ती दान केली आहे.
मुघल बादशाह अकबर, शाहजहां आणि औरंगजेब आणि महिला जहाँआरा बेगम यांनी आग्रा आणि हैदराबाद येथील धार्मिक स्थळांना मोठ्या प्रमाणात जमीनी दान केल्या आहेत.
अहमदाबादचे सर सय्यद मुहम्मद, माजी उपराष्ट्रपती अब्दुल हमीद अंसारी आणि विप्रोचे मालक अजीम प्रेमजी अशा श्रीमंत मुस्लिम व्यापारी आणि जमीनदारांनी शैक्षणिक आणि धार्मिक संस्थांना मालमत्ता दान केल्या आहेत.
दिल्ली, हैदराबाद, लखनऊ आणि अजमेर येथे वक्फ मालमत्तेची संख्या सर्वाधिक आहे.