Jagdish Patil
भारतीय पोलिस सेवा म्हणजेच IPS ही एक अखिल भारतीय सेवा आहे. ज्याची भरती UPSC परीक्षेद्वारे केंद्र सरकार करते
IPS अधिकाऱ्यांची नियुक्ती केंद्र सरकार तसेच विविध राज्यातील सरकार करू शकते.
IPSअधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा अधिकार कोणाला असतो याबाबतची माहिती जाणून घेऊया.
IPS अधिकाऱ्याला निलंबित करण्याचा अधिकार त्या राज्याच्या सरकारच्या असतो ज्याच्या अंतर्गत ते काम करतात.
मात्र, IPS अधिकाऱ्याला निलंबित करण्यासाठी राज्य सरकारला यासंदर्भातील अहवाल 15 दिवसांत केंद्राला पाठवावा लागतो.
IPS अधिकाऱ्याच्या निलंबनाचा राज्य सरकारचा आदेश केवळ 30 दिवसांसाठी वैध असतो.
आयपीएस अधिकाऱ्याच्या निलंबनाची मुदत वाढवायची असेल तर राज्य सरकारला केंद्राची मंजुरी घ्यावी लागते.
तर IPS अधिकाऱ्याला नोकरीवरून काढण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींना असतो.