सरकारनामा ब्यूरो
आसाम-मेघालय केडरचे आनंद मिश्रा हे 2011 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
मूळचे बिहारचे मिश्रा यांनी UPSCच्या परीक्षेत ऑल इंडिया रँक 225 मिळवली होती.
आसामच्या लखीमपूर जिल्ह्याचे एसपी म्हणून तैनात होते. तेथील बेधडक कामगिरीमुळे त्यांना 'आसामचा सिंघम' असे संबोधले जाते.
मणिपूरमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली असून, राज्यातील हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या एसआयटी (Special Investigation Team)चा एक भाग बनले आहेत.
कोलकातामधून त्यांनी आपले शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर पश्चिम बंगाल नागरीमध्ये सेवा बजावली.
नंतर त्यांनी UPSC ची परीक्षा उत्तीर्ण केली आणि IPS अधिकारी झाले.
बंडखोरी आणि माफियाविरोधी कारवायांमध्ये मास्टर असलेले मिश्रा यांचे इंस्टाग्रामवर हजारो फॉलोअर्स आहेत.
R