Rajanand More
आचार्य प्रमोद यांचा जन्म 4 जानेवारी 1965 रोजी उत्तर प्रदेशातील संभळ मध्ये त्यागी परिवारात झाला होता.
तरूण वयातच अध्यात्माकडे वळले आणि आचार्य झाले. त्याचवेळी ते काँग्रेसच्या विचारधारेकडेही ओढले गेले.
दोनवेळा काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवली. 2014 मध्ये संभळमधून तर 2019 मध्ये लखनऊमधून. पण पराभूत झाले.
काँग्रेसच्या उत्तर प्रदेश सल्लागार समितीत त्यांचा सहभाग होता. प्रियांका गांधी यांनी ही समिती स्थापन केली होती.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यावर काँग्रेसच्या बहिष्कारानंतर होते नाराज. उघडपणे पक्षाच्या नेत्यांवर टीका.
एका कार्यक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक भाजप नेत्यांना निमंत्रण. मोदींचेही केले कौतुक.
काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेवरही टीका केली होती. अशा यात्रेने काही फरक पडणार नसल्याचे विधान.
पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले.
राम आणि राष्ट्रच्या मुद्यावर समझोता नाही, असे म्हणत त्यांची निलंबनानंतर राहुल गांधींवर टीका. भाजपमध्ये जाण्याची शक्यता.