Satnam Singh Sandhu : कुलपती ते राज्यसभा खासदार सतनाम सिंग संधू...

Rashmi Mane

राज्यसभेवर नियुक्ती

चंदीगड विद्यापीठाचे कुलगुरू सतनाम सिंग संधू यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची नियुक्ती केली आहे.

Sarkarnama

मोदींनी केले अभिनंदन

या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत संधू यांचे अभिनंदन केले आहे.

Sarkarnama

विद्यापीठाचे कुलपती

चंदीगड विद्यापीठाचे कुलपती सतनाम सिंह संधू यांनी राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली.

Sarkarnama

कोण आहेत सतनाम सिंग संधू?

सतनाम सिंग संधू सध्या चंदीगड विद्यापीठाचे कुलगुरू आहेत.

Sarkarnama

शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण

संधू यांचे बालपण अडचणी आणि कष्टांनी भरलेले होते. त्यांनी आपल्या आयुष्यात खूप संघर्ष केला. त्यानंतर ते या पदावर पोहोचले आहेत. त्यांनी शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण अशा अनेक क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे.

Sarkarnama

ग्रुप ऑफ कॉलेज

सतनाम सिंग यांनी 2001 साली मोहालीच्या लांडरान येथे चंदीगड ग्रुप ऑफ कॉलेजेसची पायाभरणी केली होती. त्यानंतर 2012 मध्ये चंदीगड विद्यापीठाची स्थापना झाली.

Sarkarnama

दर्जेदार शिक्षणावर भर

आयुष्यातील अडचणी आणि संकटांना तोंड देत त्यांनी विद्यापीठात 'दर्जेदार शिक्षण'वर विशेष भर दिला आणि लाखो विद्यार्थ्यांना आर्थिक मदतही केली.

Sarkarnama

'इंडियन मायनॉरिटीज फाउंडेशन'

'इंडियन मायनॉरिटीज फाउंडेशन' आणि न्यू इंडिया डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून ते आरोग्य आणि कल्याण सुधारण्यासाठी काम करत आहेत.

Sarkarnama

Next : कर्तव्यनिष्ठ आयपीएस अधिकारी ! CBI संचालक प्रवीण सूद...

येथे क्लिक करा