Jagdish Patil
राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पार्टीच्यावतीने नितीन पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.
विधानभवनात पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सातारची जागा निवडून आणल्यास नितीन पाटलांना खासदार करणार असा शब्द दिला होता.
आता दादांनी सातारकरांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे. तर अजितदादांनी थेट राज्यसभेवर वर्णी लावलेले नितीन पाटील कोण आहेत ते जाणून घेऊया.
नितीन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे वाई महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील यांचे भाऊ आहेत.
तसंच सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षही आहेत. त्यांचे भाजपच्या नेत्यांशीही चांगले संबंध आहेत.
त्यांच्या बँकेच्या कार्यक्रमासंदर्भात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली होती.
लोकसभेवेळी सातारची जागा राष्ट्रवादीकडे घ्यावी अशी मागणी केली जात होती. मात्र उदयनराजे भोसलेंना उमेदवारी दिल्यानंतर अजितदादांनी नितीन पाटलांना खासदारकीचा शब्द दिला होता.