सरकारनामा ब्यूरो
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत मुकेश अंबानी आणि गौतम अदानी येतात. याचं यादीतील एक नाव म्हणजे स्पेनमधील व्यावसायिक अमानसियो ओर्टेगा जे झारा ब्रॅन्डचे मालक आहेत.
वयाच्या 13 व्या वर्षी कपड्यांच्या दुकानात डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारे अमानसियो यांचे वडील एक रेल्वे कर्मचारी होते. नंतर त्यांना एका चांगल्या दुकानात सहाय्यक म्हणून काम केले.
अमानसियो यांनी कपड्यांच्या व्यवसायातील सगळं काही शिकून घेतले आणि 1963 मध्ये स्व:ताचा ‘बाथरोब’चा व्यवसाय सुरू केला.
1975ला त्यांनी पहिला झारा नावाचे स्टोअर उघडले. झाराही जगातील तिसरी सर्वात मोठी फॅशन रिटेल कंपनी आहे. जगात 7 हजार 400 हून जास्त स्टोअर्स आहेत. गेल्यावर्षी त्यांचे उत्पन्न $34.1 अब्ज होते.
अमानसियोंनी 1985 मध्ये ऑर्टेगाने इंडिटेक्स नावाची एक होल्डिंग कंपनीची स्थापना केली.त्यांना त्यांच व्यवसाय पोर्तुगाल, फ्रान्स आणि अमेरिकेत वाढवत पुल अँड बेअर आणि बर्शका ब्रँड लाँच केले
मॅसिमो दुट्टी म्हणजे जो कश्मीरी, लोकरीचे कपड्याचा ब्रॅन्ड आणि महिलांसाठी कपडे, शूज आणि एक्सेसरीज बनवारा स्ट्रॅडिव्हेरियस हा स्पॅनिश ब्रँड विकत घेतले.2010ला या कंपनीचे 77 देशांमध्ये 5 हजारहून अधिक स्टोअर्स झाले.
यावर्षी त्यांची एकूण संपत्ती 3.95 असून ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहेत.
ऑर्टेगाला 10 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त नफा मिळाला.यातूनच त्यांनी स्पेन, अमेरिका, युरोपमध्ये ऑफिस आणि रिटेल प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी गुंतवले.