Jagdish Patil
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण अंजली दमानिया यांनी चांगलंच लावून धरलं आहे.
आरोपी वाल्मिक कराडशी धनंजय मुंडेंचे व्यावसायिक संबंध असल्याचा आरोप करत त्यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
तर धनंजय मुंडेंना भिडणाऱ्या आणि त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या अंजली दमानिया कोण आहेत ते जाणून घेऊया.
अंजली दमानिया या भ्रष्टाचाराविरोधात लढा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत.
2012 मध्ये त्यांनी RTI कायद्याद्वारे कोंढाणे धरण प्रकल्पातील भ्रष्टाचार प्रकरण उघडकीस आणलं होतं.
त्या 'आप'च्या सदस्या आणि प्रवक्त्या होत्या. 2014 मध्ये नागपुरामधून लोकसभा निवडणूक लढवली होती, ज्यामध्ये त्यांचा पराभव झाला.
2015 मध्ये त्यांनी आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यावर भष्ट्राचाराचे आरोप करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली.
2016 मध्ये त्यांनी एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याची मागणी करत बेमुदत उपोषण केल्यामुळे खडसेंना राजीनामा द्यावा लागला होता.