Mangesh Mahale
अनमोल बिष्णोईला अमेरिकेतून भारतात परत आणण्यात आले आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील तो मुख्य आरोपी आहे.
अनमोल हा गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ असून, त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.
पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येत हल्लेखोरांना मदत केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे.
एप्रिल २०२२ मध्ये तो बनावट पासपोर्ट वापरून भारतातून पळून गेला होता.
मुंबईतील सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारानंतर तो पुन्हा चर्चेत आला होता.
खून, खंडणी आणि अपहरण यांसारख्या ३२ हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे.
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) त्याच्या माहितीसाठी १० लाखांचे बक्षीसही जाहीर केले होते.