Mangesh Mahale
राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.
विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी महायुतीच्यावतीने बनसोडे यांचाच अर्ज आला आहे. उद्या त्यांच्या निवडीची घोषणा होणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे.
बनसोडे हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. त्यांची आधी पान टपरी होती.
कार्यकर्ता , नगरसेवक-आमदार अन् आता विधान सभेचे उपाध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.
2009 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये ते निवडून आले. 2014 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.
राष्ट्रवादी फुटीनंतर ते अजित पवार यांच्यासोबत राहिले, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा त्यांनी बाजी मारली.
आपल्या मतदारसंघातील नागरिकांसाठी कोरोनाच्या लसीच्या खरेदीसाठी त्यांनी आमदार निधीतून 25 लाख रुपये दिले होते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं आहे.