Roshan More
आराधना मिश्रा, ज्या मोना नावानेही ओळखल्या जातात, त्या रामपूर खास विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेसकडून तीन वेळा विजयी झालेल्या आहेत.
त्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेत्या आहेत. त्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार प्रमोद तिवारी यांच्या कन्या आहेत.
आराधना मिश्रा दोन दशकांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय आहेत.
त्यांचे वडील प्रमोद तिवारी यांनी रामपूर खास मतदारसंघातून नऊ वेळा आमदार म्हणून काम केले.
प्रतापगडमधील रामपूर खास विधानसभा मतदारसंघावर तिवारी कुटुंबाचे ४७ वर्षांपासून वर्चस्व आहे.
आराधना मिश्रा या प्रियांका गांधी वद्रा यांच्या जवळच्या मानल्या जातात. त्यांनी प्रियांका गांधी यांच्या ' लडकी हू लढ सकती हू ' या मोहिमेतही त्यांच्यासोबत काम केले होते.
आराधना मिश्रा यांची नियुक्ती उत्तर प्रदेशच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून करण्यात आले.
80 च्या दशकात काँग्रेसच्या ब्राम्हण मतदारांचा मोठा पाठींबा होता. मात्र उत्तर प्रदेशामध्ये तो हा घटला आहे. त्यामुळे आराधना मिश्रा यांच्या रुपाने काँग्रेसने ब्राम्हण कार्ड खेळल्याची चर्चाआहे.