Akshay Sabale
बाबा सिद्दीकी हे बिहारचे रहिवाशी होते. त्यांचा जन्म 13 सप्टेंबर 1956 रोजी झाला होता.
बाबा सिद्दीकी हे त्यांचे वडील अब्दुल रहीम सिद्दीकी यांच्यासोबत घड्याळ दुरूस्त करायचे.
बाबा सिद्दीकी यांनी विद्यार्थी नेता म्हणून राजकारणाला सुरूवात केली. ते पहिल्यांदा 'बीएमसी'मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले.
बाबा सिद्दीकी यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला काँग्रेसमधून सुरूवात केली. 1977 मध्ये त्यांनी पक्षाची विद्यार्थी संघटना ‘एनएसयूआय’मध्ये प्रवेश केला.
1980 मध्ये ते वांद्रे युवक काँग्रेसचे सरचिटणीस, 1982 मध्ये वांद्रे युवक काँग्रसचे अध्यक्ष आणि 1988 मध्ये मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले.
1999, 2004, 2009 मध्ये ते वांद्रे पश्चिम मतदारसंघातून आमदार झाले. ते अन्न आणि कामगार राज्यमंत्री होते. 2014 मध्ये त्यांचा पराभव झाला.
2014 मध्ये बाबा सिद्दीकी यांना मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बनवण्यात आले. 2019 मध्ये त्यांचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या संसदीय मंडळात समावेश करण्यात आला.
फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडली आणि अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला.