Amol Sutar
भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून त्यात एकूण 195 नावांची घोषणा करण्यात आली आहे.
नवी दिल्लीतून लोकसभा निवडणुकीसाठी बांसुरी स्वराज यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दिवंगत माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या बांसुरी स्वराज कन्या आहेत.
बांसुरी स्वराज या पेशाने वकील असून त्या सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करीत आहेत.
त्यांनी इंग्रजी साहित्यात बीए ऑनर्ससह पदवी घेतल्यानंतर लंडनमधील बीपीपी लॉ स्कूलमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सेंट कॅथरीन कॉलेजमधून बांसुरी स्वराज यांनी मास्टर्स केले आहे.
भाजपकडून बांसुरी स्वराज यांना याआधी कायदेशीर सेलचे सहसंयोजक म्हणून जबाबदारी दिली होती.
सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर त्यादेखील राजकारणात सक्रिय झाल्या आहेत.
आता त्यांना थेट नवी दिल्लीतून लोकसभेसाठी भाजपने उमेदवारी दिल्याने त्या राजकारणात आणखी सक्रिय होणार आहेत.