Roshan More
भूपेंद्र सिंग हुड्डा हे हरियाणातील काँग्रेसचे मोठे नेते आहेत.
काँग्रेसने हरियाणा विधानसभा निवडणुकीची उमेदवारी यादी जाहीर केली आहे. या यादीत भूपेंद्र सिंग हुड्डा यांचे देखील नाव आहे.
माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंग हुड्डा यांना सांपला-किलोई विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.
भूपेंद्र सिंग हुड्डा हे मार्च 2005 ते ऑक्टोबर 2014 पर्यंत हरियाणाचा राज्याचे मुख्यमंत्री होते.
भूपेंद्र सिंग यांनी वकिलीचे शिक्षण घेतले आहे.
हरियाणात 'ताऊ' या नावाने प्रसिद्ध असलेल्या चौधरी देवी लाल यांचा सलग तीन वेळा लोकसभा निवडणुकीत भुपेंद्र सिंग हुड्डा यांनी पराभव केला.
2001 ते 2004 या काळात हुड्डा हरियाणा विधानसभेत विरोधी पक्षनेतेही होते.
हु्ड्डा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस 2004 मध्ये सत्तेत आली. तसेच 2009 मध्ये पुन्हा सत्ता मिळवली. 1972 नंतर पहिल्यांदाच हरियाणात एका पक्षाची सलग दुसऱ्यांदा सत्ता आली.