Jagdish Patil
गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजपचा राजीनामा दिला.
अग्रवाल यांच्या जाण्यामुळे भाजपची साथ सोडणाऱ्यांमध्ये आणखी एका माजी आमदाराची भर पडली आहे.
गोपालदास अग्रवाल हे 13 सप्टेंबरला ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
काँग्रेस नेते नाना पटोले, रमेश चैन्नीथला यांच्या उपस्थितीत ते घरवापसी करणार आहेत.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
2019 च्या निवडणुकीत गोपालदास यांचा पराभव झाला तर अपक्ष आमदार विजयी झाला होता.
ते गोंदिया विधानसभा मतदारसंघातून 3 वेळा तर विधान परिषदेवर 2 वेळा आमदार म्हणून निवडून गेले होते.
त्यांचा राजकीय अनुभव दांडगा असल्याने त्यांच्या प्रवेशाने काँग्रेसची ताकद वाढणार आहे. तर हा भाजपसाठी धक्का मानला जात आहे.