Vijaykumar Dudhale
झिशान सिद्दिकी हे विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते.
विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विरोधात भूमिका घेत महायुतीच्या उमेदवाराला मतदान केल्याचा आरोप झिशान सिद्दिकी यांच्यावर आहे.
काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या आमदारांना पक्षाच्या कार्यक्रमापासून दूर ठेवण्याची सूचना हायकमांडने केल्याचे सांगितले जाते. त्यात झिशान सिद्दिकी यांचा समावेश आहे.
विधान परिषदेत निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला मतदान करणाऱ्या आमदारांना आगामी निवडणुकीत तिकिट न देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे, त्या पाच आमदारांमध्ये झिशान यांचेही नाव आहे.
काँग्रेसने दोन दिवसांपूर्वी वांद्रे पूर्व मतदारसंघात काढलेल्या रॅलीचे झिशान सिद्दिकी यांना निमंत्रण दिले नव्हते.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने काढलेल्या जनसन्मान यात्रेत आमदार झिशान सिद्दिकी सहभागी झाले होते. राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरून त्यांनी भाषणही केले
वांद्रे पूर्व मतदारसंघातून झिशान सिद्दिकी यांना उमेदवारी मागणीचा अर्ज देण्यासह काँग्रेस पक्षाने नकार दिला आहे
आम्ही आमच्या नेत्यांकडे जायचो, तेव्हा ते म्हणायचे ही मुख्यमंत्रिपदाची खुर्ची आहे. आम्ही काहीच करू शकत नव्हतो. अजितदादांना तेव्हा गरज नव्हती, तेव्हा ते अर्थमंत्री या नात्याने मला फोन करायचे आणि तेव्हाही मला वांद्रे पूर्वसाठी मला निधी मिळायचा. तेव्हापासून मी दादांचा आभारी आहे- झिशान सिद्दिकी