Jagdish Patil
बीएसएफचे महासंचालक नितीन अग्रवाल यांना पदावरून हटवून त्यांचा कार्यभार दलजित सिंग चौधरी यांच्याकडे सोपवला आहे.
1990 च्या बॅचचे IPS दलजीत सिंग चौधरी आता बीएसएफचे नवे डीजी असतील.
नितीन अग्रवाल यांना राज्य केडरमध्ये पाठवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी चौधरी यांच्याकडे महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला.
दलजित सिंग चौधरी हे उत्तर प्रदेश केडरचे 1990 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
जम्मू-काश्मिरमधील वाढत्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने BSF चे महासंचालक नितीन अग्रवाल यांना पदावरून हटवून त्यांचा कार्यभार चौधरी यांच्याकडे सोपवला.
दलजित सिंग चौधरी बीएसएफमध्ये नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती होईपर्यंत किंवा मंत्रालयाच्या पुढील आदेशापर्यंत महासंचालकपदाची जबाबदारी सांभाळतील.
IPS दलजीत सिंग चौधरी यांचा जन्म 25 नोव्हेंबर 1965 रोजी दिल्लीत झाला आहे.
त्यांना आतापर्यंत तीन वेळा राष्ट्रपती पदक मिळाले आहे. ते 1990 च्या बॅचचे यूपी केडरचे अधिकारी असून 30 नोव्हेंबर 2025 रोजी निवृत्त होणार आहेत.