भाजप सोशल मीडिया सेलचा नवा चेहरा दीपक महस्के कोण?

Roshan More

आयटी सेलमध्ये बदल

भाजपची ताकद असलेल्या सोशल मीडिया सेलच्या प्रमुखपदी छत्तीसगडमधील दीपक महस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सोशल मीडिया संयोजक

दीपक म्हस्के राष्ट्रीय सोशल मीडिया संयोजक म्हणून भाजपच्या डिजिटल आणि सोशल मीडिया मोहिमांचे नेतृत्व करतील.

अमित मालवीय यांची जागा घेतली

आतापर्यंत ही महत्त्वपूर्ण जबाबदारी अमित मालवीय यांच्याकडे होती, ती आता दीपक म्हस्के यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

प्रोफेसर म्हणून सुरुवात

म्हस्के यांनी आपल्या करिअरचा प्रवास केमिस्ट्रीचे प्राध्यापक म्हणून केली होती.

15 वर्षांच्या अनुभव

म्हस्के यांना पक्षाच्या आयटी आणि सोशल मीडिया सेलमध्ये सुमारे १५ वर्षांचा अनुभव आहे.

बिहार, छत्तीसगड, बंगालमध्ये नेतृत्व

त्यांनी बिहार, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालसह अनेक विधानसभा निवडणुकांमध्ये सोशल मीडिया मोहिमांचे नेतृत्वही केले आहे, जिथे पक्षाने दणदणीत विजय नोंदवला.

शेती, डेटा विश्लेषणाचा अनुभव

अध्यापनासोबतच त्यांनी शेती आणि फलोत्पादन क्षेत्रातही कार्य केले आहे. तसेच, निवडणुकीच्या डेटा विश्लेषणाचा त्यांना चांगला अनुभव आहे.

प्रवक्ते

ते छत्तीसगड भाजपचे प्रदेश प्रवक्ते राहिलेले आहेत. राज्यातील पक्षाच्या डिजिटल मोहिमा आणि संघटनात्मक कामांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.

BJP | Sarkarnama

प्रशासकीय अनुभव

त्यांनी छत्तीसगड मेडिकल सर्व्हिसेस कॉर्पोरेशन लिमिटेड (CGMSCL) चे अध्यक्ष (चेअरमन) म्हणूनही काम पाहिले आहे.

BJP | Sarkarnama

NEXT : भाजपकडून 'को-कन्व्हेनर' म्हणून थेट राष्ट्रीय पातळीवर मोठी संधी, कोण आहेत पक्षनेतृत्वानं महाराष्ट्रातून हेरलेल्या प्रीती गांधी?

Preeti Gandhi | Sarkarnama
येथे क्लिक करा