Devdatta Nikam : वळसे पाटलांच्या विरोधात आंबेगावातून लढणारे देवदत्त निकम कोण आहेत?

Vijaykumar Dudhale

सरपंचपदापासून राजकीय कारकिर्दीस सुरुवात

देवदत्त निकम यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात आंबेगाव तालुक्यातील नागपूरच्या सरपंचपदापासून झाली.

Devdatta Nikam | Sarkarnama

भीमाशंकर कारखान्याचे 10 वर्षे अध्यक्ष

गावचे सरपंचपद यशस्वीपणे सांभाळल्यानंतर देवदत्त निकम हे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक झाले. त्याच टर्ममध्ये निकम कारखान्याचे अध्यक्ष झाले. त्यांनी तब्बल 10 वर्षे कारखान्याच्या अध्यक्षपदी काम पाहिले.

Devdatta Nikam | Sarkarnama

लोकसभेची उमेदवारी

कारखान्याचा कारभारातील त्यांची झलक पाहून राष्ट्रवादी काँग्रेसने देवदत्त निकम यांना 2014 मध्ये शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात लोकसभेची उमेदवारी दिली होती. शरद पवारांनी शिवनेरी किल्ल्यावर त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती.

Devdatta Nikam | Sarkarnama

लोकसभेला पराभव

लोकसभेच्या निवडणुकीत देवदत्त निकम यांचा शिवसेनेच्या आढळराव पाटील यांच्याकडून तब्बल तीन लाख मतांनी पराभव झाला.

मंचर बाजार समितीचे सभापती

देवदत्त निकम हे मंचर बाजार समितीचे पाच वर्षे सभापती होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत मंचरला डिजिटल बाजार समिती बनवले. बाजार समितीचे सर्व व्यवहार डिजिटल स्वरूपात होतात.

Devdatta Nikam | Sarkarnama

वळसे पाटलांनी तिकिट नाकारले

मंचर बाजार समितीच्या निवडणुकीत देवदत्त निकम यांना राष्ट्रवादी काँग्रेस पर्यायाने दिलीप वळसे पाटील यांनी तिकिट नाकारले. पण, बंडखोरी करत ते बाजार समितीच्या निवडणुकीत निवडून आले. वळसे पाटलांच्या विरोधात निवडून आलेले ते पहिलेच बंडखेार नेते ठरले आहेत.

Devdatta Nikam | Sarkarnama

पवारांना साथ देण्याचा निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दिलीप वळसे पाटील हे अजित पवार यांच्यासोबत गेले, तर देवदत्त निकम यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला.

Devdatta Nikam | Sarkarnama

आंबेगाव विधानसभेचे संभाव्य उमेदवार

आंबेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देवदत्त निकम हे उमेदवार असतील, असे संकेत आज शरद पवार यांनी मंचर येथील पत्रकार परिषदेच्या दरम्यान दिले.

Devdatta Nikam | Sarkarnama

देशाची दिशा बदलणारं मनमोहन सिंग यांचं 'Epochal' बजेट काय होतं?

Manmohan Singh | Sarkarnama
Next : येथे क्लिक करा