Vijaykumar Dudhale
धर्मराज काडादी यांना राजकीय आणि सामाजिक कार्याचा वारसा घरातूनच मिळाला आहे.
सोलापूरचे माजी खासदार आप्पासाहेब काडादी यांचे ते धर्मराज काडादी हे नातू आहेत
धर्मराज काडादी हे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष असून सध्या ते कारखान्यावर मार्गदर्शक संचालक म्हणून कार्यरत आहेत. सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे धर्मराज काडादी हे अध्यक्ष आहेत.
धर्मराज काडादी यांनी सोलापूरमधून लोकसभेची निवडणूक लढवावी, असा आग्रह काँग्रेसकडून अनेकवेळा झाला. मात्र, काडादी यांनी निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.
सोलापूर विकास मंचचे केतन शहा यांच्यासोबत धर्मराज काडादी यांचा वाद झाला होता. त्या वेळी त्यांनी पिस्तूल काढून गोळ्या घालण्याची दिलेली धमकी सोलापूरमध्ये चर्चेचा विषय ठरली होती.
सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्यामागे भाजपच्या लोकप्रतिनिधींचा हात आहे, असा आरोप धर्मराज काडादी यांनी अनेकदा केला, त्यातूनच निवडणूक लढविण्याचा दबाव त्यांच्यावर वाढत गेला.
भाजपकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून पडद्यामागून सूत्रे हलविणारे धर्मराज काडादी हे अखेर लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या व्यासपीठावर उघडपणे गेले.
महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली तर दक्षिण सोलापूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी धर्मराज काडादी यांनी दर्शविली आहे, त्यातूनच त्यांनी मतदारसंघातील हत्तूर येथून प्रचाराला सुरुवात केल्याचे मानले जात आहे.