Rashmi Mane
डोनाल्ड ट्रम्प आज (20) जानेवारीला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत.
या काळात त्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत अमेरिकन संसद भवनात उपस्थित असेल. त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्याव्यतिरिक्त, मुलगी इवांका ट्रम्प, मुले डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर आणि एरिक ट्रम्प देखील उपस्थित राहतील.
जाणून घेऊया त्यांची मुलगी इवांका ट्रम्प यांच्याबद्दल..
डोनाल्ड ट्रम्प यांची दुसरी मोठी मुलगी इवांका ट्रम्पने मॉडेलिंग क्षेत्राक काम केले आहे, तसेच त्यांचा 'फॅशन ब्रँड' देखील आहे.
इवांकाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या आधीच्या अध्यक्षपदाच्या काळात व्हाईट हाऊसमध्ये सल्लागार म्हणून काम केले आहे.
इवांकाने पती जेरेड कुशनर यांनी ट्रम्प कार्यकाळात वरिष्ठ सल्लागार म्हणूनही काम केले आहे.
याशिवाय, इवांकाने 'द ट्रम्प कार्ड' आणि 'वूमन हू वर्क्स' ही पुस्तके लिहिली आहेत.