सरकारनामा ब्यूरो
आज 20 जानेवारीला डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाचा शपथविधीसोहळा यूएस कॅपिटलमध्ये रोटुंडा हॉल येथे पार पडणार आहे.
अमेरिकामध्ये राष्ट्राध्यक्ष 20 जानेवारीलाच शपथ का घेतात? काय आहे याचे कारण जाणून घेऊयात...
दर चार वर्षांनी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीनंतर अमेरिकेमध्ये 20 जानेवारीला नवीन राष्ट्राध्यक्ष शपथ घेतात.
20 जानेवारीला शपथ घेण्याची परपंरा अमेरिकेमध्ये 1937 पासून सुरु झाली. या दिवसाला 'इनॉग्रेशन डे' अस म्हटले जाते.
1933 पर्यंत शपथविधीची घेण्याची तारीख 4 मार्च होती.
1933 मध्ये झालेल्या यूएस संविधानाच्या 20व्या दुरुस्तीनुसार 20 जानेवारी हा दिवस शपथविधीचा दिवस म्हणून निश्चित करण्यात आला.
अमेरिकेतील शपथविधीचा दिवस बदलण्याचे कारण म्हणजे नवीन राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ लवकर सुरू व्हावा जेणेकरून सरकारी कामकाजात अडचण येऊ नये.
1933 मध्ये राज्यघटनेत केलेल्या दुरुस्तीनुसार पहिल्यांदाच फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांनी 20 जानेवारी 1937 ला राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली होती.