Roshan More
भाजपने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी डाॅ. परिणय फुके यांना उमेदवारी दिली आहे.
डाॅ. फुके युतीच्या काळात भाजपच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांचे विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात.
फुके यांना भंडाऱ्याचे पालकमंत्री पद देण्यात आले होते.
फुके हे यापूर्वी गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेवर निवडूण गेले होते. प्रफुल पटेल यांचे समर्थक राजू जैन यांचा पराभव केला होता.
विधानसभेच्या निवडणुकीत परिणय फुके हे काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्या विरोधात उमेदवार होते. मात्र, त्यांना पटोले यांच्या विरोधात पराभव स्वीकारावा लागला.
फुल पटेल आणि जैन महायुतीत सहभागी झाले आहेत. भंडारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवरून भविष्यात होणारे मतभेद टाळण्यासाठी फुके यांना विधान परिषदेवर पाठवून सुरक्षित करण्यात आले आहे.
फुके यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली आहे. तसेच आगामी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना मंत्रिपद मिळणार का? याची चर्चा आहे.